शिवसेनेची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीत बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेले गाळे पूर्ववत सुरू करण्याची मागणी साठी शिवसेना शिंदे गटाने कर्जत नगरपरिषद प्रशासनाला पत्र देवून केली. गेली पाच वर्षे हे गाळे बंद असून स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी शिंदे गटाने ते गाळे खुले करावेत अशी मागणी केली आहे. नगरपरिषदेच्या ताब्यात असलेले शॉपिंग झोन मधील गाळे आजपर्यंत बंद आहेत. स्थानिक बेरोजगारांना हे गाळे देऊन रोजगाराला प्राधान्य द्या तर पालिकेचा महसूल ही बुडला जातोय आणि त्यामुळे ते गाळे पुन्हा सुरू करून महसूल सुरू करावेत या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे वतीने निवेदन देण्यात आले. कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी कर्जत नगर परिषदेला घेराव घालून संतप्त सवाल केला.मात्र नेहमीप्रमाणे पालिकेचे मुख्याधिकारी हे अनुपस्थित असल्याने हे निवेदन कार्यालयीन अधिक्षक रविंद्र लाड यांच्याकडे देण्यात आले.
नगरपरिषद हद्दीतील जुने एस. टी. स्थानक भिसेगाव, कर्जत सर्व्हे नं. 23/2, मंगलमूर्ती हि इमारत गुंडगे रोडवर आहे. येथील गाळे स्थानिक बेरोजगार युवकांना भाडेतत्त्वावर देणेबाबत क सुर्वे आणि सचिन खंडागळे यांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भिसेगाव व गुंडगे परिसरातील स्थानिक युवकांच्या मागणीनुसार जुने एस. टी. स्टॅन्ड, भिसेगाव, कर्जत सर्व्हे नं. 23 / 2 मंगलमूर्ती इमारती मधील गाळे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. सदरील नगरपरिषदेचे गाळे स्थानिक बेरोजगारांना भाडेतत्त्वावर दिल्यास नगरपरिषदेस उत्पन्न सुरु होईल व बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. गुंडगे – भिसेगाव परिसरासाठी शिवसेना उप शहर संघटक सचिन चंद्रकांत खंडागळे यांच्या पत्रावर कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांस निवेदन देण्यात आले आणि या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा असा इशारा देखील देण्यात आला.यावेळी नदीम भाई खान, अशोक मोरे, सचिन खंडागळे, दिनेश कडू, पंकज पवार, मिथिलेश म्हामुणकर, पंकज शिंदे, प्रज्योत घोसाळकर, नारायण जुनघरे, नारायण सुर्वे, विशाल बैलमारे, तेजस गायकर, स्वप्नील जाधव, संदीप कर्णूक, उदय जाधव तसेच शिवसैनिक उपस्थित होते.