| मुंबई | प्रतिनिधी |
अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. लाडक्या बहिणींसाठी जाहीर केलेले 2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. यामुळे विरोधक आक्रमक झाले. बजेट पूर्णपणे निराशाजनक आहे. शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारं हे बजेट आहे. कोणत्याही योजना नाही, तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.