भंगार व्यावसायिकाचे नुकसान, जीवितहानी नाही
| रायगड | खास प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कोलाड भिरा फाट्यावरील भांगराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजणण्याच्या सुमारास घडली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने आगीसह धुराचे लोट उसळले होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दल, विविध सामाजिक संस्था तसेच रेस्न्यू टीम यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सदरचे भंगार गोडाऊन हे अभिमान वायकर यांचे आहे. आगीमध्ये भंगार जळून खाक झाले आहे. यामध्ये भंगार व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते, पोलीस कर्मचारी, रोहा नगर परिषद अग्निशामक वाहन, एसव्हीआरएसएस टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक माहिती पोलीस घेत आहेत.

सदरचे भंगार गोडाऊन हे अभिमन्यू वायकर यांचे आहे. आगीमध्ये भंगार जळून खाक झाले आहे. यामध्ये भंगार व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग विझवण्यात आली आहे. वायकर यांच्याकडे भंगारसंबंधी परवाना आहे.
नितीन मोहिते,
सहायक पोलीस निरीक्षक, कोलाड