श्रमदान शिबीराचे आयोजन

। उरण । वार्ताहर ।

सारडे विकास मंचच्या संकल्पनेतून कोमणादेवी ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली. या पार्कमध्ये असणार्‍या छोट्या डोहाची सफाई गेली तीन वर्ष सारडे विकास मंचातर्फे करत आहे. मातीने भरलेल्या डोहाची सफाई सदाबहार दोस्ती प्रतिष्ठान गडप्रेमी गणेश भोईर, सागर पाटील, हरिश्‍चंद्र म्हात्रे खोपटे यांच्या आयोजनातून करण्यात आली. पावसाळ्यात येणार्‍या पर्यटकांना मनसोक्त पोहण्याचा आनंद मिळावा यासाठी सारडे विकास मंच हा प्रयत्न करीत आहे. हा डोह सफाई करून पाणी साठवण्याजोगे तयार केला. यासाठी सदाबहार दोस्ती प्रतिष्ठानचे हरिश्‍चंद्र म्हात्रे, संतोष जोशी, तुकाराम गावंड, कामेश्‍वर म्हात्रे, सचिन पाटील, अरुण म्हात्रे, कैलास पाटील, जितेंद्र, म्हात्रे, विजय गावंड, डॉ. हिराचंद पाटील, प्रतीक पाटील आदींनी या उपक्रमास हातभार लावला.

Exit mobile version