। माणगाव । वार्ताहर ।
उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.१०) सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत एचडीएफसी बँकेच्या समोर, मुंबई-गोवा महामार्गालगत पेपर विक्रेते नितीन मेथा यांच्या जवळील महेंद्र मेथा यांचा सभागृह जुने एसटी स्टँड माणगाव याठिकाणी करण्यात आले आहे. तरी सदर शिबिराचा लाभ समाजातील सर्व गरीब गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन उद्योजक विजयशेठ मेथा यांनी केले आहे.
या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणार्या रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड याची झेरॉक्स प्रत आणावी. तसेच मधुमेहाची व रक्तदाबाची औषधे सुरु असल्यास तीदेखील घेऊन यावीत. रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी जाण्याची, राहण्याची, जेवणाची व परत आणून सोडण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. सदर शिबिरात सहभागी होणार्या नेत्ररुग्णांनी नावनोंदणीकरिता विधिता मनीष मेथा मो.नं. – 8698740640, सुप्रिया संतोष शिंदे मो.नं.- 9049665598 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.