। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील महर्षि विनोद सिध्दाश्रम सेवा मंडळतर्फे विशेषतः अलिबागमधील आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. सिध्दाश्रम केतकीचा मळा येथे शनिवारी (दि. 08) सकाळी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषीवलच्या संपादिका माधवी सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त स्वयंपाकाचे शास्त्र या विषयावर डॉ. सुषमा वाघ, उद्योगमुख दुर्गा लघु उद्योजकांची मार्गदर्शिका उर्मिला वारळकर, डॉ. शुभदा कुडतलकर, माधुरी म्हात्रे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.