| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील रॉयल गार्डनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जॉब कनेक्ट इव्हेंटच्या सहकार्याने सुधाकर घारे यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभापती एकनाथ धुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उदघाटन करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव, भगवान चंचे, महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे, रणजीत जैन, विलास थोरवे, अशोक सावंत, धोंडू राणे, दीपक श्रीखंडे, सोमनाथ पालकर, वंदना थोरवे, पूजा सुर्वे, सरपंच प्रभावती लोभी, राजेंद्र निगुडकर, नगरसेविका मधुरा चंदन, भारती पालकर, सोमनाथ ठोंबरे, नैना आखाडे, राम कोळंबे, मनोहर पाटील, चिंधु तरे, सुनील गायकवाड, हृषीकेश राणे, तानाजी चव्हाण, बंडू तुरडे, कैलास घारे, रवींद्र घारे, शिवाजी लोभी, संभाजी कडू, बाळू थोरवे, भानुदास पालकर, अनिल मोरे, विद्या सोनावणे, हेमंत कोंडीलकर आदी उपस्थित होते.
जॉब कनेक्ट इव्हेंटच्या रघुराम गायकवाड, देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 66 कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले होते. 6900 युवा- युवतींनी नावे नोंदविली होती. त्यापैकी 2976 बेरोजगारांना तेथेच नोकरीची नियुक्ती पत्रे दिली. याप्रसंगी तानाजी चव्हाण, बंडू तुरडे, कैलास घारे, रवींद्र घारे, शिवाजी लोभी, संभाजी कडू, बाळू थोरवे, भानुदास पालकर, अनिल मोरे, विद्या सोनावणे, हेमंत कोंडीलकर आदी उपस्थित होते.