| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील खांब परिसरात यंत्राच्या सहाय्याने केशव खरीवले यांनी रब्बी हंगामात भातलागवड केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी करे, कृषी सहाय्यक नरेश जामकर, सारिका दिघे-सावंत, कविता दोरुगडे, परिसरातील शेतकरी दिलीप लाडगे, नंदकुमार कापसे, नथुराम शिंदे, प्रदीप भांदुर्गे उपस्थित होते. यावेळी महादेव करे यांनी यंत्राने भातलागवड करणे म्हणजे काळाची गरज आहे, असे सांगितले.