| नेरळ | वार्ताहर |
कर्जत रेल्वे स्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न करीत असताना एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (दि. 26) रोजी दुपारी सव्वातीन वाजता कर्जत रेल्वे स्टेशनवर चेन्नई एक्सप्रेस पकडताना अपघात झाला. प्रवासी हा ठाणे घोडबंदर येथील राहणार असून त्याचे नाव भानुदास विठ्ठल खरात असून ते जनरल कोचमधून प्रवास करत होते. प्लॅटफॉर्मवर उतरण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि ते थेट प्लॅटफॉर्म व ट्रेनच्या दरम्यान पडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आनंद लोखंडे करत आहेत. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी प्रवाशांना रेल्वे प्रवासात खबरदारी घेण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.