। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग रेवस मार्गावरील चोंढी नाका येथे एका अवजड वाहनाच्या धडकेने पादचारी जखमी झाल्याची ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे . त्याला अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे . वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची चर्चा तेथील स्थानिक करीत आहेत.