| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील पेणतर्फे तळे हे गाव स्वदेश फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 20) मान्यवरांच्या उपस्थितीत ‘स्वप्नातील गाव’ म्हणून सन्मानित करण्यात आले. पेणतर्फे तळे गाव हे तालुक्यातील सामाजिक, अध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण गाव आहे. या गावाला जाखडी नृत्याची फार मोठी परंपरा लाभली आहे.
स्वदेश फाउंडेशनमार्फत पेणतर्फे तळे या गावात अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. स्वदेशमार्फत गावातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. गावातील महिलांना आर्थिक नियोजन कसे करावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गावातील कुटुंबांना सोलर लाइट देण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात वीज बचत होत आहे. स्वदेस फाऊंडेशन व ग्रीन कम्युनिटी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गावातील कचरा वर्गीकरण व संकलन केला जातो. तसेच अनेक शेतकर्यांना फळबाग लागवड व भाजीपाला लागवड या साठी सहकार्य करण्यात आले आहे. गावातील स्वच्छता, संस्कृतिक वातावरण व आधुनिकता याचा मेळ घालून स्वप्नातील गाव बनविण्यात गावातील महिला बंधू-भगिनींचा मोठे योगदान लाभले आहे.
या सन्मानित सोहळ्यासाठी स्वदेश फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, वरिष्ठ व्यवस्थापक मेघना फडके, व्यवस्थापक शीतल सूर्यवंशी, वरिष्ठ समन्वय किरण शिंदे, ग्रीन कम्युनिटी फाउंडेशन रायगडचे व्यवस्थापक, मनोहर पाटील, ग्रामस्थ मंडळ पेण तर्फे तळे अध्यक्ष देवजी माने, उपाध्यक्ष सीताराम पोटले, सचिव नामदेव ताम्हणकर, गाव विकास समितीचे अध्यक्ष साईनाथ पेणकर, उपाध्यक्ष गणेश वडेकर, सचिव मनोज पेणकर, खजिदार मंगेश भागडे, स्वदेस मित्र निधी पोटले, श्रद्धा पेणकर, ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वप्नातली गाव पुरस्काराचे सूत्रसंचालन नयन पोटले यांनी केले. पेंटर पातळे गाव स्वप्नातील गाव झाल्याने गावातील ग्रामस्थ मुंबईकर मंडळ महिला यांनी आनंद व्यक्त केला आहे. पेण गाव हे स्वप्नातील गाव झाल्याने पंचक्रोशीतून ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे.