। रोहा । वार्ताहर ।
रोहा नगर पालिकेने प्लास्टिक पिशवी वापरणार्या 39 व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करीत 19 किलो प्लास्टिक जप्त केला आहे. शासनाने प्लास्टिक बंदी कायदा लागू केल्यानंतर रोहा अष्टमी नगर पालिकेने सर्व व्यापारी बांधवांना जाहीर आवाहन करत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका अशी तंबी देण्यात आली होती. तरी देखील काही व्यापारी मंडळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याची माहिती समजताच मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण आणि स्वछता, आरोग्य विभागाला धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. स्वछता व आरोग्य निरीक्षक मनोज पुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे दुकानदार, पथविक्रेते, भाजीपाला विक्रेते अशा पद्धतीचे 39 व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करून 19,500 रुपये दंड स्वरूपात रक्कम वसूल करण्यात आली आहे.