शेकापमुळेच जनतेची कामे मार्गी: चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन

बहुचर्चित न्हावे पुलाच्या कामाचे भूमिपूजन
| रोहा | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच सामान्य जनतेची कामे करण्यास पुढे असतो, यापुढेही पक्षाच्या माध्यमातून विकासकामांचा स्त्रोत सुरुच ठेवला जाईल, असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रविवारी ( 19 मार्च) न्हावे, ता.रोहा येथे केले. रोहा तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील पुलाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. याबाबत शेकाप सरचिटणीस आ जयंत पाटील यांनी विधिमंडळात सातत्याने आवाज उठवला होता.

या पुलाच्या दुरुस्तीसाठी 40 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या कामाचे भूमिपूजन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला गणेश मढवी, नंदकुमार म्हात्रे, जितेंद्र जोशी, लक्ष्मण महाले, संदेश विचारे, लियाकत खोत, काशिनाथ भोईर, अमोल शिंगरे, नारायण गायकर, राज जोशी, पांडुरंग तांबडे यांच्या सह चणेरा विभागातील शेकाप कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य व ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच सामान्य जनतेची कामे करण्यास पुढे असतो. या भागातील अनेक कामे माजी आ.पंडित पाटील यांच्या प्रयत्नाने मार्गी लागली आहेत. आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित कामांना देखील न्याय देण्यात येईल. – चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख

Exit mobile version