अलिबाग नगरपालिकेचे कार्य उत्तम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोविड 19 (साथीचा रोग) सर्वत्र पसरल्यामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे पथविक्रेत्यांच्या व्यवसायास खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
या योजनेनुसार नागरी पथविक्रेत्यांना रक्कम रुपये 10 हजार पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज बँकाव्दारे उपलब्ध करुन देण्यात येते. या कर्जाची परतफेडीची मुदत 1 वर्षाची असून हे कर्ज मंजूर करतेवेळी बँकेकडून कोणत्याही प्रकारचे तारण घेतले जात नाही. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणार्या पथविक्रेत्याला 7% व्याज अनुदान दिले जाणार असून ही व्याज अनुदानाची रक्कम दर तीन महिन्यांनी म्हणजेच वर्षातून चार वेळा पथविक्रेत्याच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार अलिबाग नगरपरिषदेने आजपर्यंत 108 लाभार्थींना पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंर्तगत लाभ दिलेला आहे.
लाभार्थीचे नाव :- चंद्रकांत बापू दरडीगे , रा. घरतआळी -अलिबाग. मो. न. 927154360
हे लाभार्थी अलिबाग नगरपरिषद हद्दीतील भाजी मार्केट येथे फळ व भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेंतर्गत दरडीगे यांचा कर्जमागणी अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र अलिबाग शाखा यांच्याकडे दि. 03 सप्टेंबर 2020 रोजी पाठविण्यात आला होता. व दि.10 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचा कर्ज मागणी अर्ज बँकेने मंजूर करुन रक्कम रु. 10000/- त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
2. सचिन लक्ष्मण शिवदे, रा. मोदीवाडा, अलिबाग, मो. नं. 7350730407
हे लाभार्थी अलिबाग नगरपरिषद हद्दीतील मोदीवाडा ते मारुती नाका येथे चणे व शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय करतात. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेंतर्गत सचिन लक्ष्मण शिवदे यांचा कर्जमागणी अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र अलिबाग शाखा यांच्याकडे दि.07 /सप्टेंबर 2020 रोजी पाठविण्यात आला होता व दि. 23 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचा कर्ज मागणी अर्ज बँकेने मंजूर करुन रक्कम रु. 10000/- त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
3. श्री. निलेश मनोहर जगे, रा. कोळीवाडा-अलिबाग मो. नं. 8421402099
हे लाभार्थी अलिबाग नगरपरिषद हद्दीतील कोळीवाडा ते अलिबाग समुद्र किनारा येथे भेळ विक्रीचा व्यवसाय करतात. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेंतर्गत श्री. निलेश मनोहर जगे यांचा कर्जमागणी अर्ज बँक ऑफ इंडिया अलिबाग शाखा यांच्याकडे दिनांक 08 सप्टेंबर 2020 रोजी पाठविण्यात आला होता. व दिनांक 28 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचा कर्ज मागणी अर्ज बँकेने मंजूर करुन रक्कम रु. 10000/- त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
- श्री. राजेश अनंतराय पंडया, रा. मयूर बेकरी जवळ मो. नं. 8605870034
हे लाभार्थी अलिबाग नगरपरिषद हद्दीतील पोस्ट ऑफीस ते अलिबाग समुद्र किनारा येथे सरबत व थंड पेय विक्रीचा व्यवसाय करतात. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेंतर्गत श्री. राजेश अनंराय पंडया यांचा कर्जमागणी अर्ज पंजाब नॅशनल बँक अलिबाग शाखा यांच्याकडे दिनांक 07 सप्टेंबर 2020 रोजी पाठविण्यात आला होता. व दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचा कर्ज मागणी अर्ज बँकेने मंजूर करुन रक्कम रु. 10000/- त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. - सुनिता जुईकर, रा. सिध्दार्थ नगर-अलिबाग मों. नं. 7083635061
हे लाभार्थी अलिबाग नगरपरिषद हद्दीतील शिवाजी पुतळयाजवळ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेंतर्गत श्रीमती सुनिता जुईकर यांचा कर्जमागणी अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र अलिबाग शाखा यांच्याकडे पाठविण्यात आला होता. व त्यांचा कर्ज मागणी अर्ज बँकेने मंजूर करुन रक्कम रु. 10000/- त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.