ताम्हणी घाटात खासगी बसला अपघात; 55 जखमी

दोन महिलांचा मृत्यू

। रायगड । प्रतिनिधी ।

माणगांव पोलीस ठाणे हद्दीत ताह्मणी घाटात शनिवारी सकाळी 07.30 वाजण्याचे सुमारास खासगी ट्रॅव्हल्स (MH-04-FK-629 हि पुणेवरून माणगांवकडे येत असताना रस्त्याखाली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला असून 55 प्रवासी जखमी आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तसचे, वाहतूक सुरळीत चालू असल्याची माहीती पोलिसांनी दिली.

Exit mobile version