। जबलपूर । वृत्तसंस्था ।
मध्यप्रदेशातील जबलपूर शहरातील खाजगी रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावर सोमवारी आग लागली. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश रुग्णालयातील कर्मचारी आहेत. दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही दुर्घटना घडली. आरडाओरडाही केल्यानंतर लोकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. आगीचे कारण समजू शकले नाही.