। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा खेळवली जात आहे. 2017 नंतर प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. यासह 1996 नंतर प्रथमच पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तर भारताचे सर्व सामने हे दुबईमध्ये होणार आहेत. दरम्यान आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संपूर्ण बक्षिसाची एकूण रक्कम ही तब्बल 6.9 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 59 कोटी इतकी आहे. ही रक्कम 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकूण बक्षिसाच्या रकमेपेक्षा 53 टक्केने वाढवली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेत्या संघाला 2.24 मिलियन म्हणजेच 19 कोटी 45 लाख इतकी रक्कम मिळणार आहे. उपविजेत्या संघाला 1.12 मिलियन म्हणजेच 9.72 कोटी मिळणार आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेत्या संघाला 2.24 मिलियन म्हणजेच 19 कोटी 45 लाख इतकी रक्कम मिळणार आहे. उपविजेत्या संघाला 1.12 मिलियन म्हणजेच 9.72 कोटी मिळणार आहेत. तर उपांत्य फेरीतील प्रत्येक पराभूत झालेल्याला 5.60 मिलियन म्हणजेच 4.86 कोटी रक्कम मिळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे, कारण प्रत्येक गट टप्प्यातील सामना विजयाची किंमत रु. 29.5 लाख रूपये असेल. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना 3.04 कोटी रूपये मिळतील. तर सातव्या आणि आठव्या क्रमांकावरील बाजू संघाला 1.21 कोटी बक्षिस रक्कम मिळेल. सर्व आठ संघांना आयसीसी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल 125,000 मिलियन म्हणजे 1.08 कोटी रूपये मिळतील.
आयसीसी स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांची दोन गटात विभागणी केली आहे. तर प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन दर 4 वर्षांनी केले जाते. ज्यामध्ये जगातील 8 उत्कृष्ट वनडे संघ सहभागी होतात. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना दिसणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश हे संघ अ गटात आहेत. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ ब गटात आहेत.
अनेक संघांमध्ये बदल
बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 2017 नंतर तब्बल 8 वर्षांनंतर ही आयसीसी स्पर्धा खेळवली जात आहे, ज्याचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक संघांना महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतींना सामोर जावं लागलं आहे. त्यामुळे संघांमध्ये अनेक बदल करावे लागले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारतासह तीन संघांमध्ये दुखापती आणि इतर कारणांमुळे उशीरा बदल करण्यात आला आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बदल करण्याची मुभा आयसीसीने दिली होती. ऑस्ट्रेलियाने पाच बदल केले आहेत, तर भारताला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीने मोठा धक्का दिला आहे.