। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा येथील नामदेव शिंपी समाज यांच्या विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 672 वा समाधी सोहळा श्री संत नामदेव महाराज मंदिरात संपन्न झाला. समाधी सोहळ्यानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रसाद करंबे, अजय करंबे, रणजित बारटक्के, संतोष पानसारे,संजय पाटकुले, अमर करंबे, दिलीप करंबे,दादा पानसरे, अनिकेत पानसरे, राखी करंबे,गजानन करंबे,महेंद्र ढवळे, नीता ढवळे, परिणीती पाटुकले, भावना बारटक्के, प्राची जावळे, सरिता पानसरे,वैष्णवी करंबे,मंदाकिनी करंबे,मालती करंबे,प्रभाकर करंबे,प्रमोद कळस नीकिता कळस,रामकृष्ण करंबे सुरेश कुडेकर, प्रसाद पोतदार, डॉ. अलंकार करंबे, प्रतिक गोविलकर आदि मान्यवर उपस्थित होते.