। नेरळ । प्रतिनिधी ।
बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नेरळमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या आवाहनानंतर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी नेरळ ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी आंदोलन जाहीर केले होते. यानुसार शनिवारी सकाळी नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंडावर काळ्या फिती लावून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला मविआच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होतो.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांच्यासह सुरेश गोमारे, सुधाकर देसाई, संदेश लाड, अल्पेश मनवे, सुमन लोंगले, सुजाता मनवे, चव्हाण, संजय कांबळे, गणेश मनवे, सुरेश ठाकरे, सचिन चित्रे, प्राची मनवे, चेतन गुरव, कांबळे, सुरेश टोकरे, नोमन नजे, सदानंद जाधव, संजय गवळी, अरविंद कटारिया, आनंद मोडक आदी आंदोलनासाठी उपस्थित होते.