| आगरदांडा | प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य पुणे व विभागीय आयुक्त, कोकण विभाग बेलापूर यांच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी या शासकीय अॅपच्या अद्ययावत आवृत्तीबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 5 रोजी सकाळी 10 वाजता वसंतराव नाईक महाविद्यालय, मुरुड-जंजिरा येथे व सकाळी 11 वाजता अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड-जंजिरा येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व खातेदार व नागरिकांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती राहून सहकार्य करावे, असे आवाहन मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले