। मुंबई । वृत्तसंस्था ।
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे स्वतंत्र लढवणार की भाजपासाबोत युती करुन लढवणार, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विजयाचा अश्वमेध रोखायचा विडाच भाजपाने उचललेला आहे. अशा स्थितीत मनसेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. हिंदुत्वाच्या वाटेवर असलेले राज ठाकरे या निवडणुकीसाठी भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी ८ वाजता भेट घेतली. सागर बंगल्यावर झालेल्या दोघांच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जवळ जवळ राज ठाकरे फडणवीसांमध्ये तासभर चर्चा रंगली होती. या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.