| मुंबई | प्रतिनिधी |
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या वादळामुळे जोरदार पाऊस, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वादळाचा प्रभाव आणि हवामानाचा अंदाजहवामान खात्याच्या मते, चक्रीवादळ शक्तीमुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशात जोरदार पाऊस पडेल, तर महाराष्ट्रात पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा प्रभाव दिसेल. रायगड जिल्ह्यात 18 मेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन ते चार आठवडे राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.