उरण | वार्ताहर |
चिरनेर गावातील स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे काम पी.पी. खारपाटील व राजाशेठ खारपाटील या दोन बंधूंनी पी.पी. खारपाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेतले आहे. त्यामुळे दुरवस्था झालेल्या चिरनेर गावातील स्मशानभूमीला नवा लूक प्राप्त झाला आहे. या समाजाभिमुख कार्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी तसेच गाव परिसरात येणार्या गणेशभक्तांनी, पर्यटकांनी खारपाटील बंधूंचे अभिनंदन केले.
नवी मुंबई परिसरातील उद्योजक तथा चिरनेर गावातील सुपुत्र पी.पी. खारपाटील व राजाशेठ खारपाटील या दोन बंधूंनी चिरनेर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. गावातील रहिवाशांची मृत्यूसमयी, अंत्यविधीप्रसंगी स्मशानभूमीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पी.पी. खारपाटील कंपनीच्या माध्यमातून स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे काम स्वखर्चाने पूर्ण आहे. त्यामुळे स्मशानभूमीला नवा लूक प्राप्त झाला असल्याने चिरनेर गावातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केला आहे.