पनवेल । वार्ताहर ।
नव्याने विकसित होत असलेल्या रोडपाली वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून तेथील पथदिवे सुद्धा बंद अवस्थेत आहेत. तरी या दोन्ही नागरी समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी मागणी जिल्हाप्रमुख शिरिष घरत व महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी सिडकोच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
यावेळी कळंबोली शहरप्रमुख डी. एन. मिश्रा, उपशहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर, शहर संघटक संभाजी चव्हाण, शहर संघटक अक्षय साळुंखे, विभागप्रमुख महेश गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.