भेंडखळ येथे जरीमरी आईचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

| उरण | वार्ताहर |

भेंडखळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या जरीमरी आईच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा सोमवारी (दि. 16) मोठ्या भक्तिभावाने गावकर्‍यांच्या उपस्थित पार पडला.

या सोहळ्याचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी, गावकर्‍यांनी सहभाग घेऊन जरीमरी आईच्या मूर्तींचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तसेच इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ घरत, उपाध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष मंजिता पाटील, सेक्रेटरी सूरज ठाकूर, खजिनदार विजय ठाकूर, रेखा ठाकूर, अशोक ठाकूर, शिवाजी ठाकूर यांच्यासह जीर्णोद्धार कमिटीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी मान्यवरांचे स्वागत केले.

Exit mobile version