। रायगड । प्रतिनिधी ।
भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त परिमंडलातील रोहित्र (डीपी), उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 1898 कर्मचारी, अभियंते व अधिकार्यांनी परिमंडलातील 2212 रोहित्र, 133 उपकेंद्र आणि 265 कार्यालयांची साफसफाई केली. महावितरणच्या या उपक्रमाचे वीज ग्राहकांनी स्वागत व कौतुक केले आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आखण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्यासह कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण रहांगदळे, नमिता गझदर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र बागुल यांच्यसासह 35 जणांनी सक्रिय सहभाग नोंदवत भांडुप परिमंडल कार्यालयाची साफसफाई केली. तर ठाणे मंडल कार्यालयांतर्गत भांडुप, मुलूंड, ठाणे शहर एक आणि दोन, वागळे इस्टेट विभागात 451 अधिकारी व कर्मचार्यांनी 1387 रोहित्र, 47 उपकेंद्र आणि 61 कार्यालयांची स्वच्छता केली. वाशी मंडल कार्यालयातील नेरुळ, वाशी आणि पनवेल शहर विभागात 551 अधिकारी व कर्मचार्यांनी 108 रोहित्र, 48 उपकेंद्र आणि 55 कार्यालयांमध्ये साफसफाई केली. पेण मंडल कार्यालयांतर्गत अलिबाग, गोरेगाव, रोहा व पनवेल ग्रामीण विभागातील 861 अधिकारी व कर्मचार्यांनी 715 रोहित्र, 37 उपकेंद्र आणि 148 कार्यालयांमध्ये स्वच्छता केली. यात रोहित्रांच्या भोवती वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्या आदी हटविण्यात आल्या. याशिवाय वाढलेले गवत रोहित्राच्या सभोवतीचा कचरा साफ करण्यात आला