| पाताळगंगा | वार्ताहर |
श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ अजीवली यांच्या माध्यमातून समस्त वारकरी आणि ग्रामस्थांतर्फे हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रंगछंदचे कलाकार रोशन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील संत तसेच कीर्तनकार यांची रांगोळी साकारण्यात आली. यासाठी 15 सहकारी 3 दिवस सातत्याने या संताची रांगोळी काढण्यासाठी व्यस्त होते. समस्त वारकरी आणी ग्रामस्थांना ह्या रांगोळी च्या माध्यमातून जवळून पहता यावे या उद्दात विचारांतून ह्या रांगोळ्या साकारण्यात आल्या.
यावेळी भक्त पुंडलिक, संत नामदेव, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत शिरोमणी सावता माळी, संत गोरा कुंभार, संत सखुबाई, संत एकनाथ, जगतगुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत बहिणाबाई, संत भगवान बाबा, कीर्तनकार महाराज त्याचप्रमाणे विठ्ठल रखुमाई – ही रांगोळी च्या माध्यमातून साकारण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाले.
गेले अनेक वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून या ठिकाणी सुंदर देखावे, त्यास प्रशस्त मंडप उभारण्यात आले आहे. विविध धार्मिक पुस्तके, आयुर्वेदीक औषधे याच असे विविध स्टॉल उभारण्यात आले आहे. या कीर्तनाला जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार आणि वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येन उपस्थित राहत असून त्याच्या अमोघ वाणीचे चंचळ मनाला स्थिर ठेवणारे कीर्तनकार यांचे अखंड सात दिवस भजन कीर्तन होत आहे.