। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वायशेत ता. अलिबाग येथिल गंगादेवी भजन मंडळाचे बुवा व हरिश्चंद्रबुवा लोणारकर यांचे शिष्य समर्थ पाटील यांचा आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमला देवस्थान येथे शनिवार दि. 16 जुलै रोजी दुपारी ठिक तीन वा. भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण टिव्हीमध्ये वेंकटेश्र्वरा भक्ती चॅनेल (SVBC) वर पाहता येईल. विविध नेटवर्क वर SVBC चॅनेल क्र. : Dish TV – 1695, Tata Sky – 1497 / 1598 , Airtel DTH – 940, Videocon D2H – 744 / 600, Reliance Digital TV – 842, GTPL – 563, Asianet – 667, Sun Direct – 616, Hathway – 759, Siti Cable – 90
सदर कार्यक्रमात मराठी, हिंदी व कन्नड रचना सादर करताना तबला जगदीश पाटील, पखवाज विराज म्हात्रे, हार्मोनियम नरेश कडु, टाळ ॠषिकांत भगत व कोरस म्हणुन गंगादेवी भजन मंडळाचे सदस्य साथसंगत करतील.
गंगादेवी भजन मंडळ हे रायगड जिल्हातील नोंदणीकृत भजन मंडळ असुन तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रायोजित भजन सेवा सादर करणारे रायगड जिल्ह्यातील पहिलेच मंडळ आहे.तरी जिल्ह्यातील भजन रसिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील व सल्लागार ॲड. प्रसाद पाटील यांनी केले आहे.