रायगड जिल्ह्यात प्रथम तर राज्यात पाचवी
। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी येथील सावनी नितीन भोसले ही राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून या यशाबद्दल तीचे विविध स्थरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
चिंचवली तर्फे दिवाळीसारख्या खेडेगावातील सावनी भोसले ही राज्यात पाचवी तर रायगड जिल्ह्यात पहिली आली असून आम्ही खेडेगावातील मुले ही कुठे कमी नाही, असे या मुलीनी सिद्ध करून दाखविले आहे. सावनी नितीन भोसले ही इयत्ता दुसरीमध्ये शिकत असून अतिशय लहान वयात तीने हे यश संपादीत केले असुन तिला तीचे शिक्षक हिना सौदागर, रुभीना पठाण,विजय भोसले,व तीची आई रोहिणी भोसले, वडील नितीन भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तिच्या या यशाबद्दल कोलाड हायस्कूलचे माजी मुख्यध्यापक शिरीष येरुणकर सर, संदीप भोसले तसेच चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामस्थ यांनी सावनी भोसले हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.