| श्रीवर्धन | वार्ताहर |
महाराष्ट्र सरकारतर्फे अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती प्रवर्गातील शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र बाकी प्रवर्गातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. अशा विद्यार्थिनींना एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई मार्फत उर्वरित विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या योजनेखाली शैक्षणिक शुल्क परतावा मंजूर झाला आहे. तो विद्यार्थिनींना देण्याचा कार्यक्रम महिला महाविद्यालयात सल्लागार समितीचे तज्ञ सदस्य आनंद जोशी यांचे हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल केदार जोशी यांनी केले. त्यानंतर प्राचार्य डॉ.डी.पी राणे यांनी आपल्या मनोगतात या शिष्यवृत्ती शुल्क परताव्यामागील भूमिका विषद केली. प्रमुख पाहुणे आनंद जोशी यांनी मनोगतांत सांगितले की, शिष्यवृत्ती शुल्क परत मिळाल्याचा आनंद तर आहेच परंतु आता उत्तम गुणवत्तेने उत्तीर्ण होण्याची विद्यार्थिनींची जबाबदारी आता वाढली आहे. सानिया दिवेकर हिने आभार प्रदर्शन केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.