। सुतारवाडी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडली येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन सुशीला म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या जीवन कार्याची माहिती शाळेचे पदवीधर शिक्षक मोहन राठोड व शिक्षिका सुचेता रामधरणे यांनी करून दिली. संत सेवालाल महाराज यांच्या विचार संपूर्ण मानवजातीचा उद्धार करणारे आहेत. ते आपण सर्वांनी आत्मसात केले पाहिजे, असे मोहन राठोड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या जयंतीनिमित्त इयत्ता सातवीचा विद्यार्थी सुशांत गवळी यांनी संत सेवालाल यांच्या विषयी माहिती सांगितली. तसेच, शाळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.