। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्याला सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्या दिवशी उरण, पनवेल, नेरळ आणि खालापूरमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. दरम्यान, हजारो कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते. उद्या रविवारी (दि.9) पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिर येथे सकाळी दहा वाजता, दुपारी एक वाजता सुधागड तालुक्यातील नांदगाव संत नामदेव माध्यमिक विद्यालय, सायंकाळी साडेचार वाजता रोहामधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातील सभागृहात आणि सायंकाळी सहा वाजता मुरूडमधील उसरोली येथील आगरी समाज हॉल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.