| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील कोकण फुड हॉटेल येथील मॅनेजरला एका सराईत गुन्हेगाराने त्याच्याकडे असलेल्या तलवारीने धमकावून दर महिन्याला हप्ता देण्याची मागणी केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे. तकदीर साळुंखे (रा.नवनाथनगर झोपडपट्टी) याने त्या परिसरात असलेल्या कोकण फुड हॉटेलचा मॅनेजर चंदन श्यामराव (34) याच्याकडे फुकटची बिअर मागितली असता सदर बिअर देण्यास मॅनेजरने नकार दिल्यावर त्याने मॅनेजरला शिवीगाळ व धक्काबुक्की करून काऊंटरवर असलेले स्वॅप मशीन फिर्यादीला फेकून मारले. तसेच हातामध्ये नंगी तलवार घेऊन हॉटेलमध्ये घुसून धमकाविल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला तलवारीसह ताब्यात घेतले आहे.