राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रमिका अन्‌‍ विदिशाची सुवर्ण कामगिरी

| अलिबाग | प्रतिनिधी |

कल्याण येथे झालेल्या शालेय गतका मार्शल आर्ट राज्यस्तरीय स्पर्धेत जे. एस. एम अलिबाग कॉलेजची गोल्डन कन्या श्रमिका पाटील या विद्यार्थिनीने फरी-सोटी या खेळामध्ये 19 वर्ष वयोगटात सुवर्णपदक पटकावले. श्रमिका पाटील हिने यापूर्वी इंडियन ऑलिंपिकच्या मान्यतेने खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये देखील महाराष्ट्राला पहिलं सिल्वर मेडल मिळवून दिलं होतं ती कराटे ब्लॅक बेल्ट आहे. महात्मा गांधी विद्या विद्यालय हशिवरे या शाळेचे विद्यार्थिनी विदिशा पाटील हिने कल्याण येथे झालेल्या राज्यस्तरीय गतका मार्शल आर्ट या फरी-सोटी खेळामध्ये सिल्वर मेडल मिळवले. विदिशा तिची बहीण जिज्ञासा पाटील तिने देखील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच दुसरी बहीण तन्मई पाटील हिने खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्वर मेडल मिळवून दिले. या दोघी बहिणी कराटे ब्लॅक बेल्ट आहेत. विजय प्राप्त केलेले श्रमिका आणि विदिशा पाटील यांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कराटे प्रशिक्षक संतोष रामचंद्र कवळे यांचे सर्वांना मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version