नवजीवन पेझारी कबड्डी स्पर्धेत श्री गणेश दिवलांगची बाजी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

नवजीवन युवक क्रिडा मंडळ पेझारी यांच्या वतीने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन रविवार ता 14 जानेवारी रोजी पेझारी येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमीनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत श्री गणेश दिवलांग विरुद्ध भैरवनाथ वावे – पाली या संघात झाली. या लढतीत श्री गणेश दिवलांग हा प्रथम क्रमांकाच मानकरी ठरला या संघास रोख रक्कम 21 हजार रु व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक भैरवनाथ वावे या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकांचा मानकरी शिवाई बांधन तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी श्री विठ्ठल कोपरपाडा या दोन्ही संघास प्रत्येकी 10 हजार रु व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पार्थ ठाकूर 3333 रु आणि आकर्षक चषक, उत्कृष्ट चढाई प्रसाद हिरडेकर 2222 व आकर्षक चषक, तर उत्कृष्ट पक्कड दर्शन पाटील 2222 रु व आकर्षक चषक, पब्लिक हिरो शशांक पाटील 1111 रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले

Exit mobile version