कामोठे ब्रिजसमोरील सिग्नल बंद

वाहतुक कोंडीची समस्या

| पनवेल | वार्ताहर |

सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे येथील ब्रिज समोर असलेले सर्व सिग्नल मंगळवारी बंद होते. त्यामुळे त्या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तातडीने सिग्ल सुरु करुन वाहतुकीची होणारी गैरसोय दुर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. सायन-पनवेल या मार्गावरुन गोव्याकडे तसेच, पुण्याकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु असते. सध्या सकाळी आणि सायंकाळनंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने येत आहेत.

सायन-पनवेल मार्गावरीज्ञ कामोठे ब्रिज समोरील सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे वाहतुकीची फार मोठी समस्या निर्माण झाली होती. चारही बाजूने एकाच वेळी वाहने ये-जा करत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. या कालावधीत वाहतुक पोलिस दिसून आले नाहीत. संबंधीत यंत्रणेने येथील सिग्नल लवकर सुरु करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version