तहसीलदारांना निवेदन सादर
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शनिवार रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन देऊन आरोपीविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी काळी फीत लावून मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी डॉ. संकेत म्हात्रे सचिव, डॉ. अशोक जाधव, डॉ. अभय ससाणे, डॉ. निशीथ ध्रुव, डॉ. रघुनाथ भट, डॉ. आनंद वागळे, डॉ. तेजकुमार आपणकर, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. अतुल पाटील, डॉ. रूपेश होडबे, डॉ. विनोद किणीकर, डॉ. मुकेश सिंग, महिला डॉक्टर्स डॉ. मीनल वागळे, डॉ. पूर्वी ध्रुव, डॉ. नंदिनी तेलंगे, डॉ. योगिनी घायले, डॉ. ऋचा वागळे, डॉ. सविता किणीकर, डॉ. रचना माळी, डॉ. तनुजा पवार, डॉ. श्वेता सिंग, डॉ. पूजा भट, डॉ. मनीष वैरागी, डॉ. तुषार राजपूत, विनोद गुडसुरकर, डॉ. कांचन पाटील यांसह तालुक्यातील 60 डॉक्टर उपस्थित होते.
महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहेच; परंतु या महिलेला न्याय मिळण्यासाठी हा खटला न्यायालयात फास्टट्रॅकवर चालवण्यात यावा जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे एका महिला डॉक्टरार हल्ला करण्याची हिमत करणार नाही. आरोपीवर कठोरपणे कारवाई करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे रोहा डॉक्टरांचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.