। मुरुड । वार्ताहर ।
मौजे विहूर येथील सर्व्हे न. 20/1 (गट न. 111) लगतच्या जागेतील कच्छ वनस्पती, तिवरांती कत्तल करून तैझुन निसार हसोन्जी व त्यांचे हस्तक सी आर झेड कायद्याला खुलेआम छेद देत असल्याचा आरोप विहुर ग्रामस्थांनी केला आहे. या विषयीचे निवेदन मुरुड तहसिलदार रोशन शिंदे यांचे मार्फत जिल्हाधिकार्यांना नुकतेच देण्यात आले.
किनारपट्टीवरील 200 मीटर पर्यंतच्या क्षेत्रास सीआरझेड म्हणून घोषित करण्यात आल्याचा उल्लेख करून आच्छादलेला तिवर झाडांचे क्षेत्र भू-बंदिस्त केला जात आहे. किनार्या वरील आच्छादलेल्या तिवर झाडांची कत्तल करून मातीचा भराव टाकून समुद्री शेवाळ, सीग्रास या वनस्पतीचे गेल्या सहा महिन्यापासून नामोनिशान मिटवण्यात आल्या असल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे.संबंधितांवर तातडीने कारवाई केली जावी,अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करत असलेल्या तैजून निसार हसोन्जी यांचे विरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी तक्रार विहुर ग्रामस्थांनी केली आहे.मात्र त्याबाबत प्रशासनाकडून काहीही कारवाई केली जात नसल्याने तीव्र संतापही व्यक्त होत आहे.