। नवीन पनवेल । वार्ताहर ।
63 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून चोरटे मोटरसायकलने पळून गेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुजाता ठक्कर या पनवेल येथे राहत असून तीन जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास त्या मोटरसायकल वरून फरसाण घेऊन परत आल्या. आणि इमारतीच्या कंपाउंडच्या आत गाडी पार्क केली. त्या बिल्डिंगच्या पायरी जवळ आले असता पाठीमागून एक इसम आला. यावेळी त्यांनी कोण पाहिजे असे विचारले असता त्याने काहीही उत्तर दिले नाही. आणि जबरदस्तीने ठक्कर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली. त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने धक्का मारून त्यांना खाली पडले आणि तो पळून गेला. यावेळी मोटर सायकलच्या मागे बसून दोघेही इसम पळून गेले. 27 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेणार्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.