अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे यांचे आज अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे आगमन झाले. यावेळी वाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सरिता भगत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी सरपंच तथा अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जयेंद्र भगत उपस्थित होते. अभिनेत्री पूजा हेगडे या स्वागताने भारावून गेली. तिने सर्वांचे आभार मानून पुन्हा नक्की परत येण्याचे वचन ग्रामस्थांना दिले.