सहदेव कापसे यांचा विशेष सन्मान

। खांब/रोहे । वार्ताहर ।
अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन, कोल्हापूर-इंडिया तर्फे राज्यस्तरीय बेस्ट टिचर अवॉर्ड 2021 ने सन्मानित शिक्षक सहदेव कापसे यांचा कोलाड बिटमधील सर्व शिक्षकवृंदाकडून विशेष सन्मान करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास कोलाड, येरळ, तिसे, पुगाव, कुडली पाचही केद्रांचे केंद्र प्रमुख, रा.जि.प.शिक्षण समिती शिक्षण व क्रीडा समिती आमंत्रित सदस्य अजय कापसे, रोहा शिक्षक पतपेढीचे विद्यमान सदस्य चंद्रकांत वरखले, किशोर जाधव, अलिबाग पतपेढीचे संचालक तथा बीटमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बेस्ट टिचर अवॉर्ड हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्यामुळे पुरस्काराची किंमत वाढली असल्याचे गौरवोद्गार रत्नाकर कनोजे यांनी आपल्या मनोगतात काढले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रद्धा बिरगावले तर आभारप्रदर्शन कुलकर्णी यांनी केले.

Exit mobile version