| माणगाव | प्रतिनिधी |
तळा तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धा दि. 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान बोरघर येथील ज्ञानदीप विद्यामंदिर या ठिकाणी संपन्न झाल्या. यावेळी या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द विद्यालयाने भरघोस यश संपादन करून नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
14 वर्षे वयोगट मुले- हर्ष तांबे 400 मीटर प्रथम व 600 मीटर धावणे द्वितीय, वेदांत घाटवळ उंच उडी व 100 मीटर रिलेत प्रथम. 14 वर्षे वयोगट मुली- रोशनी जाधव 100 मीटर प्रथम. 17 वर्षे वयोगट मुले- समर्थ येरूणकर उंच उडी व 800 मीटर धावणे प्रथम, 1500 मीटर धावणे द्वितीय. 17 वर्षे वयोगट मुली- विशाखा नटे 200 मीटर धावणे प्रथम, दीक्षित साळुंखे 200 मीटर धावणे द्वितीय, जागृती कदम 400 मीटर धावणे द्वितीय, आदिती पाटील 400 मीटर धावणे तृतीय, स्नेहा आंबर्ले 1500 मीटर धावणे प्रथम, आदिती पाटील 3000 मीटर चालणे प्रथम, विशंखा नटे 3000 मीटर चालणे द्वितीय, कल्याणी पतारे भालाफेक प्रथम, सलोनी गोळे हातोडा फेक प्रथम, निधी महाडिक हातोडा फेक द्वितीय व रिले 100 मीटर तृतीय.
तसेच, 14 वर्ष वयोगटातील मुलींनी कबड्डी द्वितीय व 14 वर्षे वयोगटातील मुलांनी खो-खोत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या यशासाठी विद्यालयाचे क्रिडा प्रमुख विनोद लाड व ए.व्ही. गावित, दीपक गुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.