| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील महामार्गावर असलेल्या कलोते या गावाजवळ गतीरोधक बसविणे अत्यंत गरजेचे बनले आहे. महामार्गावर काही ठिकाणी स्पीड ब्रेकर असून ते निदर्शनास येत नाही. यामुळे काही वेळा आपघाताला सामोरे जावे लागत आहे. महामार्ग जवळच कलोते गाव असून शिवाय पौध नडोदे, निगडोली अश्या विविध गावातील नागरिक हा जवळचा मार्ग अवलंबतात. परिणामी या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे रस्ता ओलंडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दोन्ही मार्गावरुन येणारी वाहने वेगाने येत असल्यामुळे समोरुन येणार्या वहानांचा अंदाज न आल्यामुळे मोठे तसेच किरकोळ आपघात घडले आहे. परिणामी रस्ता ओलांडता जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मार्गावरून खोपोली कडे जाणारे नागरिक रस्ता पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. शिवाय वय वृद्ध वाहन चालक रस्ता ओलांडताना केव्हा समोरून वहान येईल यांची शास्वती नाही. मात्र या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसल्याने वाहानांचा वेग मंदावला जाईल, तसेच होणार्या आपघातावर आळा बसेल. मात्र असे असले तरी सुद्धा समंधित अधिकारी मात्र बघ्यांची भूमिका निभावत आहे. यांचा नाहक त्रास रस्ता ओलांडत असलेल्या नागरिकांना होत आहे.
गेले अनेक वर्ष या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले नसल्यामुळे हा रस्ता पार करेपर्यंत जिव मुठीत ठेवायला लागत आहे. मुंबई-पुणे या दोन्ही बाजूंनी वाहानांची सातत्याने रहदारी असते. यामुळे दोन्ही रस्ता एकाच वेळी पार करावे लागते. या ठिकाणी लवकारत लवकर स्पीड बसविण्यात यावे, अशी मागणी या ठिकाणी प्रवास करणारे नागरिक व्यक्त करीत आहे. मात्र या ठिकाणी केव्हा स्पीड ब्रेकर बसविले जातील यांच चिंतेने प्रवासी वर्गांना ग्रासले आहे.