। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने झुंझार युवक मंडळ पोयनाडने पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामना शनिवारी (दि.1) स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली विरुद्ध जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग ‘ब’ संघा बरोबर झाला. त्यामध्ये स्पोर्टी गो क्रिकेट अकॅडमी संघाने 164 धावांनी विजय मिळवला आहे.
स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी संघाने प्रथम फलंदाजी करत 38.2 षटकांमध्ये कळंबोली संघाने सर्व गडी गमावत 309 धावा फलकावर नोंदवल्या. त्यामध्ये सलामीवीर आदर्श सिंह यांनी सर्वाधिक 94, तर देवांग राय यांनी 27 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत यश देवकर यांनी 42 व भ्रताती राय हिने बहुमुले 18 धावांची खेळी केली. जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग बी संघाकडून स्वामी घाडी,प्रचित पाटील,जीत पाटील,तनिष कोरलेकर यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. प्रतिउत्तर देताना अलिबागच्या संघानी 36 षटकांमध्ये सर्व गडी बाद 145 धावा काढल्या. त्यामध्ये यश पाटील यांनी सर्वाधिक 31, तर मधल्या फळीत तनय भगत व आरुष घरत यांनी प्रत्येकी 17 धावा काढल्या. कळंबोली संघाकडून निर्भय राणे व कृष्णा भराडे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.