| कोर्लई । वार्ताहर ।
गेले कित्येक दिवसांपासून मुरुड आगारातील एस टी बस सेवा ही योग्य रित्या कार्यरत नसल्याने मुरूडच्या स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन एस टी गाड्या वेळेत उपलब्ध करून वेळापत्रकानुसार कारभार सुधारला नाही तर वेळप्रसंगी जन आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष जागन पुलेकर यांनी आपल्या सहकार्यांसमवेत आगार प्रमुख यांची भेट घेऊन देण्यात आला आहे.
मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने येथील संपूर्ण रोजगार हा पर्यटन विभागवार अवलंबून आहे. अशात शहरातील सामान्य नागरिक आणि सामान्य पर्यटक आपल्या आगारातील गाड्या वेळेवर हजर नसल्याने, त्यात यांत्रिक बिघाड असल्याने, अनेकदा चालक उपलब्ध नसल्याने अश्या अनेक कारणे यांची सर्वांची गैरसोय होत आहे. शहरातील हात मजूर आणि रोजी वरील महिला वर्गाना वेळेवर शकामावर येणे जाणे देखील कठीण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षांच्या दरम्यान अनेकदा वेळेत पोचण्यास अडचणी येत आहेत.म्हणून मनसेने या पत्राद्वारे अशी विनंती केली आहे.यावेळी जागन पुलेकर, आशिष खोत, युवराज भगत,अथर्व खोत, आकाश खोत, मनिष शामा, सिद्धेश खेडेकर, सुजित गुरव, अजिंक्य इंगळे यांसह सूरज जैस्वाल, प्रथमेश अंबुकर,निखिल कासेकर, अथर्व मसाल,ओम मयेकर उपस्थित होते.