| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी सेविका येत्या 20 फेब्रुवारी रोजी बेमुदत संपावर जाणार असल्याची अंगणवाडी सेविका प्रतिनिधी जिविता पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत महिला व बालविकास विभाग मंत्री मंगलप्रभा लोंढा यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांना 26 जानेवारी रोजी मानधन वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचारी यांना देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये मोठा असंतोष सरकार विरोधी प्रचंड संताप निर्माण झाला आहे म्हणून विविध मागण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचा इशारा शासनाला दिला आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या एक ताकदीने संपात शंभर टक्के भागीदारी करावी असे आवाहनही केले आहे. जर शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येत्या निवडणुकीत दोन लाख अंगणवाडी सेविका निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहेत निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रतिनिधी जीविता पाटील यांनी दिली.