| पनवेल । प्रतिनिधी ।
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत खांदेश्वर पोलिसांच्या टीमने सीईआर या पोर्टचा प्रभावीपणे वापर करून चोरीला गेलेले एकूण 40 मोबाईल मालकांना गुरुवारी (दि. 3) सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या हस्ते परत केले.
सध्याच्या काळामध्ये चोरांनी आपला मोर्चा मोबाईल चोरीकडे जास्त प्रमाणात वळवला असल्याचे निदर्शनास येत असून, याला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सीईआयआर या पोर्टचा वापर सुरू केला असून, त्याद्वारे चोरी गेलेले मोबाईल ट्रॅकवर टाकले गेले आणि या ट्रॅकवर तपास करून खांदेश्वर पोलिसांनी मार्च 2025 पर्यंत चाळीस मोबाईल हस्तगत केले असून ते मोबाईल मूळ मालकांना परत केले.
याकामी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप बंडगर, पोलीस हवालदार महेश कांबळे, उदय देसाई, भाऊराव भास्कर, धीरेंद्र पाटील, अमित पाटील पोलीस, नाईक मुबारक तडवी ऋषिकांत परदेशी, सचिन सरगर, युवराज शिवगुंडे, सचिन पवार, संदीप तरटे, वैभव शिंदे, प्रवीण पाटील यांनी विविध जिल्ह्यांतून व राज्यांतून आतापर्यंत सात लाख पाच हजार रुपये किमतीचे 40 मोबाईल हस्तगत करीत ते मूळ मालकांना परत केले.