नीरज चोप्राच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया

स्वित्झर्लंडमध्ये झाले उपचार


। स्वित्झर्लंड । वृत्तसंस्था ।

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने 14 सप्टेंबरच्या रात्री डायमंड लीग फायनलमध्ये दुखापतग्रस्त हाताने दुसरे स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. त्याला डायमंड ट्रॉफी जिंकता आली नाही. हाताला झालेली दुखापत हेच त्यामागचे कारण होते. नीरज चोप्राच्या हातावर सोमवारी (16 सप्टेंबर) स्वित्झर्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

15 सप्टेंबरला डायमंड लीगच्या फायनलनंतर नीरजने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्या दुखावलेल्या हाताबाबत खुलासा केला होता. 2024 चा सीझन संपत असताना, मी वर्षभरात शिकलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवत आहे. त्यात सुधारणा, अपयश, मानसिकता आणि बरेच कंगोरे आहेत. सोमवारी (9 सप्टेंबर) मला सरावाच्या वेळी दुखापत झाली आणि माझ्या डाव्या हाताचे चौथे मेटाकार्पल हाड फ्रॅक्चर झाल्याचे समजले. डॉक्टरांच्यामदतीने ब्रुसेल्समध्ये डायमंड लीग फायनल्स खेळला. मात्र, विजेतेपदापासून तो वंचित राहिला आणि त्याला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आता त्याचा हात बरा आहे.

Exit mobile version