| पुणे | प्रमोद जाधव |
शेतकरी कामगार पक्षाने कायमच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या न्यायासाठी संघर्ष केला आहे. अन्यायाविरोधात लाल बावटा घेऊन शेकाप कायम रस्त्यावर उतरला आहे. एमपीएससीच्या बारा लाख विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी शेतकरी कामगार पक्ष ढाल बनून उभा राहील. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत सरकारला जाब विचारत राहू, असा निर्धार शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ एमपीएससी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी चित्रलेखा पाटील आंदोलनस्थळी गेल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. शेतकरी कामगार पक्षाचा एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे. शेकाप विद्यार्थ्यांच्या सोबत कायम राहील. चळवळ क्रांती घडवू शकते. ही क्रांती अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.
रायगडसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा बुलंद आवाज असलेले जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने अनेक संघर्ष उभे केले आहेत. खोतांविरोधातील लढा असो, सेझविरोधातील आंदोलन असो किंवा शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या हक्कांचा प्रश्न असो, शेकापने सातत्याने आवाज उठविला आहे. गोरगरीबांवर अन्याय झाला की शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. पुणे हा शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला जिल्हा आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी आपण पुण्यात आलो असल्याचे सांगत चित्रलेखा पाटील म्हणाल्या, रोहित पवार यांच्यासारखे नेते विद्यार्थ्यांच्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खंबीरपणे हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवावा.
सरकारने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा संयम सरकारने आणखी तपासू नये, असा इशारा त्यांनी दिला. अन्याय आणि अत्याचार होत असताना आवाज उठविणे हा विद्यार्थ्यांसह आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. हा हक्क मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. चळवळीमध्ये प्रचंड ताकद असते. जनता रस्त्यावर उतरली की सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांना आपल्या खुर्च्या जाण्याची भीती निर्माण होते आणि तेव्हाच त्यांना जनतेचे महत्त्व कळते, असेही चित्रलेखा पाटील म्हणाल्या. यावेळी शेकापच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख साम्या कोरडे, रेवदंडा शहरातील चिटणीस निलेश खोत, दिपक पाटील आदी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्पोरेट खोतांविरोधातही संघर्षाची हाक
नारायण नागू पाटील यांनी संघर्ष करून खोतांना घालविले. आता या कार्पोरेट खोतांना घालविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन चित्रलेखा पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नापासून शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कांपर्यंतचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
उद्याच्या स्वच्छ प्रशासनासाठी विद्यार्थी एकत्र
एमपीएससी विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पुणे येथील एस.एम.जोशी पुलाजवळ त्यांच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. अध्यक्षांचा राजीनामा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. न्यायासाठी विद्यार्थी एकवटले आहेत. या परिसरात विद्यार्थांनी अलोट गर्दी केली आहे. दरम्यान या परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे. मात्र विद्यार्थी देखील त्यांच्या भूमिकेशी ठाम असल्याचे चित्र दिसून आले. एस.एम.जोशी परिसर आंदोलनमय झाला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य माणसाला न्याय देणाऱ्या उद्याच्या स्वच्छ प्रशासनासाठी विद्यार्थी एकत्र आले.
घोषणांनी परिसर दणाणला
पारदर्शक कारभाराचा मुद्दा घेऊन एक वेगळी चीड ठेवून विद्यार्थी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात स्वयंस्फुर्तीने विद्यार्थी सहभागी झाले. पुणेसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी आंदोलनात सामील झाले. अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असो अशा अनेक घोषणा विद्यार्थ्यांनी केल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
एमपीएससीची महाज्योती स्कॉलरशीप परीक्षा घेतली जात आहे. त्यात प्रचंड घोळ आहे .चार वर्षापासून स्कॉलरशीपची परीक्षा देत आहे. मात्र, यामध्ये घोटाळा होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सेंटरवर घोळ झाला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक नुकसान झाले







