क्रिकेट स्पर्धेत तनिज इलेव्हन विजेता

। पोयनाड । वार्ताहर ।
सुबहान इलेव्हनतर्फे अलिबाग सिटी मोहल्ला प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये तनिज इलेव्हन अलिबाग संघ विजेता तर जयान इलेव्हन अलिबाग संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेमध्ये मालिकावीर याला कुलर, ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज सुफरान सय्यदला इयरफोन व ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज इमरान पटेलला शुज,ट्रॉफी, अर्शद सय्यदला मोमेन्ट ऑफ दि टुर्नामेंटचे चांदीचे ब्रेस्लेट. मिखाद फकी, फिल्डींगअ‍ॅक्शन ट्रॉफी यांना वैयक्तीक किताब देऊन गौरवण्यात आले. सुबहान स्टार इलेव्हन संघाची शिस्तबध्द संघ म्हणून निवड करण्यात आली
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी मांडवी मोहल्यातील मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा आयोजनासाठी सागिर शेख, अरबाज सय्यद, अब्दुल रहमान, अरफात सय्यद यांनी पुढाकार घेतला. प्रत्येक सामना तीन षटकांचा खेळविण्यात आला. स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले होते. शाबीर शेख हा लकी ड्रॉचा विजेता ठरला. त्याला चांदीची अंगठी बक्षिस देण्यात आली समालोचन अन्वर हकिम यांनी केले. सामनाधिकारी म्हणून मृणाल वरसोलकर व राकेश मारीया यांनी काम पाहिले.

Exit mobile version